Advertisement

महाराष्ट्रात फक्त मराठी, नाहीतर खळ्ळखट्याक


महाराष्ट्रात फक्त मराठी, नाहीतर खळ्ळखट्याक
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजराती पाट्यांबाबत आक्रमक भाष्य केलं. त्यांच्या या भाषणानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी खळ्ळखट्याक आंदोलन करत रात्री उशिरा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हॉटेल आणि दुकानांवरील गुजराती पाट्या हटवल्या. त्यानंतर महाराष्ट्रात फक्त मराठी, नाहीतर खळखट्याक असं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर करण्यात आलं आहे.


महाराष्ट्रात फक्त मराठी

'महाराष्ट्रात फक्त मराठी. गुजराती पाट्या लावण्याचे नुसते उद्योग महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. जर असे प्रकार पुन्हा महाराष्ट्रात आढळले तर मनसेचा दणका नक्की', असं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जाहीर करण्यात आलं आहे.


आम्ही जे पाऊल उचलले आहे ते महाष्ट्राच्या जनतेसाठी. जर दुकानांसाठी गुमस्ता लायसन्स घेताना दुकानदार मराठीची अट मान्य करत असतील आणि नंतर पाट्या मात्र गुजरातीत लावत असतील तर हे नियमांविरुद्ध आहे. आम्ही फक्त दुकानांच्या पाट्या फोडल्या आहेत, दुकाने नाही. मराठीसाठी आमचं आंदोलन चालूच ठेवणार.

- कुंदन संखे - अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण 


मोदींवर केली सडाडून टीका

यावेळी राज यांनी 'मोदीमुक्त भारता'चा नाराही दिला. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अनेक दुकाने आणि हॉटेलवर मराठी ऐवजी गुजराती पाट्या लावण्यात आल्या असून मुंबई ताब्यात घेण्याची ही सुरुवात असल्याचा आरोप राज यांनी त्यांच्या भाषणात केला होता. त्यांच्या भाषणानंतर काही मनसैनिकांनी एकत्रित मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील काही दुकाने आणि हॉटेलवरील गुजराती पाट्या हटवल्या.


हेही वाचा - 

देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा