Advertisement

देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे

एकीकडे विकासाचे खोटे आकडे सादर करायचे, तर दुसरीकडे आमच्या बाजूने बातम्या दाखवल्या नाहीत, तर जाहिराती देणार नाही, असं म्हणत दमदाटी करायची, अशी भाजपाची दडपशाही सुरू आहे. याच आधारे सरकारविरोधात लिहिणाऱ्या, बातम्या देण्याऱ्या कित्येक पत्रकारांना, संपादकांना भाजपाने कामावरून काढून टाकायला भाग पाडलं, ही आणीबाणी नाही, तर काय आहे? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.

देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे
SHARES

राज्यात जणू काही सगळं नीटनेटकं आणि चांगलं चुंगलं सुरू असल्याचं दिसत आहे. म्हणूनच तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गाणं गाताना दिसत आहेत. मीडियाला हाताशी धरून भाजपानं चालवलेला हा फसवा दिखाऊपणा म्हणजे निव्वळ खोटारडेपणा असल्याचं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाच्या मीडिया मॅनेजमेंटवर कठोर शब्दांत टीका केली.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने रविवारी रात्री शिवाजी पार्कवर आयोजित सभेत राज काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यानुसार राज यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवलं.


बघा, काय म्हणाले राज ठाकरे



मीडिया मॅनेज केली

चॅनेल असो किंवा वृत्तपत्र देशातल्या सगळ्या मीडियावर मोदी सरकार आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नियंत्रण अाणलं आहे. हिटलरशाही सारखं एकतर भीती दाखवून किंवा मीडियाच्या मालकांना खरेदी करून खोट्या बातम्या दाखवल्या जात आहेत. एकीकडे विकासाचे खोटे आकडे सादर करायचे, तर दुसरीकडे आमच्या बाजूने बातम्या दाखवल्या नाहीत, तर जाहिराती देणार नाही, असं म्हणत दमदाटी करायची, अशी भाजपाची दडपशाही सुरू आहे. याच आधारे सरकारविरोधात लिहिणाऱ्या, बातम्या देण्याऱ्या कित्येक पत्रकारांना, संपादकांना भाजपाने कामावरून काढून टाकायला भाग पाडलं, ही आणीबाणी नाही, तर काय आहे? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.



नीरव प्रकरण विसरण्यासाठीच...

तब्बल ११ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून हिरे व्यापारी नीरव मोदी भारताबाहेर पळाला. यामुळे सरकारवर टीका होऊ लागताच हे प्रकरण जनतेनं विसरावं म्हणून श्रीदेवीच्या मृत्यूचं भांडवल करण्यात आलं. प्रत्येक चॅनेलवर, वृत्तपत्रांमध्ये दिवसरात्र श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ दाखवण्यात मीडियात चढाओढ लागली. हे सर्व कशासाठी? श्रीदेवीच्या मृत्यूपेक्षा देशात कुठलाही महत्त्वाचं प्रश्न नाही का? श्रीदेवीला जितकं कव्हरेज दिलं, त्याच्या अर्धा टक्के तरी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती लोया प्रकरणाला दिलं का? कुठे गेली पत्रकारांची धारदार लेखणी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


मेट्रोविरोधात लिहायचं नाही?

दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ताज हाॅटेल इथं झालेल्या बाॅम्बस्फोटानंतर पाहणी करायला गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्माही होता. त्यावरून मीडियाने देशमुख यांना झोडून काढलं होतं. त्यांना खुर्ची खाली करायला भाग पाडलं होतं. सद्यस्थितीत मुंबईत मेट्रोविरोधात लिहायचं नाही, दाखवायचं नाही, असं बाजावलं जात आहे. तरिही आताचा मीडिया सरकारविरोधात चकार शब्द काढायला तयार नाही.



सरकारचे स्पाॅन्सर्ड सिनेमे

संपूर्ण देशभरात मोदी सरकारच्या फसलेल्या प्रकल्पांचे गोडवे गायले जाताहेत. 'पॅडमॅन', 'टाॅयलेट एक प्रेमकथा' अशा सिनेमांतून मोदी सरकारच्या प्रकल्पांचा उदोउदो केला जात आहे. एवढंच नव्हे, तर या सिनेमांना सरकारने पैशांचं पाठबळ पुरवल्याचा आरोपही राज यांनी केला. हे करत असताना सिनेअभिनेता अक्षय कुमार 'भारत कुमार ' बनायला निघाला असला, तरी तो प्रत्यक्षात भारतीय नाही, तर कॅनेडियन नागरिक असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.


मुख्यमंत्री नव्हे, शाळेतला माॅनिटर

राज्यात बसवलेला मुख्यमंत्री हा शाळेतल्या माॅनिटरसारखा आहे. जो शाळेतल्या बाईंचा लाडका आहे; परंतु विद्यार्थ्यांचा नावडता आहे. कारण त्यांना मुख्यमंत्री पदावर आणून बसवलेलं आहे. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राविषयी कुठलीही अस्मिता नाही, तर दुसऱ्या बाजूला व्हिडिओत दगडावर बसून शोलेतल्या 'सांबा'सारखे दिसणारे अर्थमंत्री मुनगंटीवार यांना राज्यातले कुठलेच प्रश्न दिसत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करून राज यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांना शालजोडीतले हाणले.



हेही वाचा-

भारत मोदीमुक्त करा- राज ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा