Advertisement

भारत मोदीमुक्त करा- राज ठाकरे

२०१९ च्या निवडणुका जवळ आल्यात आणि निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून पुढे सरकवण्यात येणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल, तर तो म्हणजे राम मंदिर. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात भाजपाकडून राम मंदिरावरून देशात जातीय दंगली घडवल्या जातील, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला. हे प्रकरण साधंसरळं सोप नाही, त्यामुळे बेसावध राहू नका, असं सांगत राज यांनी देशबांधवांना सजग राहण्याचा इशाराही दिला.

भारत मोदीमुक्त करा- राज ठाकरे
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देशाला लागलेला आजार असून हा आजार दूर करावाच लागेल, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाला "मोदीमुक्त भारत"चा नारा दिला. गुढीपाडव्याच्यानिमित्तानं आयोजित मेळाव्यात बोलताना राज यांनी मोदींवर सडाडून टिका करत २०१९ मध्ये मोदी आणि भाजपाला राज्यातूनच नव्हे, तर केंद्रातूनही हद्दपार करा, असं आवाहन मनसे सैनिकांना, मराठी मतदारांना केलं आहे.

बघा, काय म्हणाले राज ठाकरे

गुजराती सोडून इतरांचा दुस्वास

मी मोदींवर मोठा विश्वास ठेवला होता, त्यांच्या गुजरात माॅडलचं कौतुक होतं, पण माझ्यासमोर जे चित्र उभं केलं ते चुकीचं होतं. गुजराती लोकं सोडली, तर मोदी इतरांचा दुस्वास करतात. पंतप्रधानांना सर्व राज्य समान असली पाहिजेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी परदेशी पाहुण्यांच्या अहमदाबादमधील पाहुणचारावरून मोदींवर चांगलीच टीका केली.

सत्तेत येण्याआधी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू, रोजगार देऊ अशी एक ना अनेक आश्वासन दिली. पण ही सगळी आश्वासन खोटी ठरली. ज्या गुजराती माणसांसाठी आपण सगळं काही करतो असं मोदी दाखवतात; त्याच गुजराती माणसांची नोटाबंदीसारख्या निर्णयातून मोदींनी वाट लावली. आज गुजराती बांधवही मोदीला कंटाळला आहे. म्हणूनच तिथे मोर्चे निघताहेत, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी मोदी हा देशाला लागलेला आजार असल्याचा आरोप केला. हाच आजार दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी २०१९ ला मोदीमुक्त भारताचा नारा दिला.

राममंदिरावरून जातिय दंगली होतील

२०१९ च्या निवडणुका जवळ आल्यात आणि निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून पुढे सरकवण्यात येणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल, तर तो म्हणजे राम मंदिर. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात भाजपाकडून राम मंदिरावरून देशात जातीय दंगली घडवल्या जातील, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला. हे प्रकरण साधंसरळं सोप नाही, त्यामुळे बेसावध राहू नका, असं सांगत राज यांनी देशबांधवांना सजग राहण्याचा इशाराही दिला.

नोटबंदी सर्वात मोठा घोटाळा  

२०१९ मध्ये जर सत्ता परिवर्तन झालं आणि नोटबंदीची चौकशी झाली, तर नोटाबंदी हा १९४७ नंतरचा सर्वात मोठा घोटाळा असेल, असा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राफेल घोटाळ्यासह नीरव मोदी प्रकरणावरून मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही राज यांनी केला.

हेही वाचा-

देशातला मीडिया मोदीनियंत्रीत- राज ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा