विरोधकांनी प्रयत्न करूनही त्यांना केंद्र तसंच राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लावता आलेले नाहीत. हेच भाजपाचं मोठं यश आहे. २०१९ च्या निवडणुकांचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घराघरांत पोहोचवून भाजपाला पुन्हा एकदा बहुमताने निवडून द्या, असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केलं.
बीकेसीमध्ये आयोजित भाजपाच्या ३८ व्या वर्धापन दिनाच्या महामेळाव्यात बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर चांगलंच तोंडसुख घेतलं. ‘‘आजकाल राहुल बाबा शरद पवार यांच्यासोबत बसतात. पवारांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे ते हल्ली खूप उड्या मारत आहेत. राहुल बाबा विचारतात मोदीजी तुम्ही साडेचार वर्षांमध्ये काय केलं, पण देश तुम्हाला विचारतोय की राहुल बाबा चार पीढ्यांपासून तुम्ही काय केलं?”, अशा शब्दांत अमित शहा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
पूर आल्यावर सर्व लहान मोठे झुडपं वाहून जातात. पण एकच वटवृक्ष उभं राहतो, त्यावर पाण्याच्या भीतीने सांप, मुंगूस, कुत्रे, मांजरं सगळेच आसरा घेतात; तसं विरोधकांचं झालं आहे. मोदींच्या लाटेसमोर सर्व विरोधक एकवटले आहेत, असं म्हणत अमित शहा यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडलं.
केंद्रात आणि राज्यात घोटाळ्याचा एकही आरोप देशभरात भाजपावर कोणी करू शकलं नाही. तशी संधीच मिळत नसल्याने विरोधकांचा तिळपापड होत आहे. त्यासाठी विरोधकांकडून जातीच्या, आरक्षणाच्या नावावर दंगली भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. पण आम्ही कुठल्याही स्थितीत आरक्षण रद्द करणार नाही आणि कुणालाही करून देणार नाही, असं म्हणत शहा यांनी कार्यकर्त्यांना २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा बहुमताने निवडून देण्याचं आर्जव केलं.
हेही वाचा-
भाजपा महामेळाव्यात मुंडे समर्थकांचा महागोंधळ
चहावाल्याच्या नादी लागू नका-मुख्यमंत्री
पश्चिम द्रूतगती महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी