‘सीएए’ हा रौलेटसारखाच काळा कायदा, उर्मिला मातोंडकरची वादात उडी

काँग्रेसच्या (congress) तिकीटावर लोकसभेची निवडणूक (loksabha election 2019) लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) हिने केंद्र सरकारच्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला (CAA) जोरदार विरोध केला आहे. एवढंच नाही, तर उर्मिलाने या कायद्याची तुलना ब्रिटीशांच्या रौलेट कायद्याशी केली आहे.

महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनामिमित्त कोथरूड गांधी भवनात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उर्मिलाने हे वक्तव्य केलं. या सभेला बिशप थाॅमस डाबरे, सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ. कुमार सप्तर्षी इ. उपस्थित होते.

हेही वाचा- मुंबईकरांवर आणखी वीजदरवाढ नको, राज ठाकरेंचं विद्युत नियामक आयोगाला पत्र

मागील काही दिवसांपासून देशभरातून सीएए (CAA) कायद्याचा विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी जनता रस्त्यावर उतरत आहे. दिल्लीतील शाहीन बाग (delhi shaheen bagh) परिसरात मुस्लिम महिला मागील ४५ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत या कायद्याविरोधात निर्दशने करत असून मुंबईतील नागपाड्यातही (nagpada) काही महिला याचप्रकारे निर्दशने करत आहेत. या कायद्यावरून राजकारणासोबतच उद्योग आणि सिनेसृष्टीतही दोन उभे गट पडल्याचं चित्र देशात निर्माण झालं आहे. एक गट या कायद्याला विरोध करत आहे, तर दुसरा गट या कायद्याला पाठिंबा देत आहे.

यावेळी उर्मिला म्हणाली, ज्या व्यक्तीने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या ती व्यक्ती कोण होती? तो एक मुसलमान होता? शीख होता की ख्रिश्चन? तो एक हिंदू होता. आता याविषयी मी वेगळं काय बोलू? सध्या देशात जे काही सुरू आहे ते अत्यंत भीतीदायक आहे.

हेही वाचा-  भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

ती पुढं म्हणाली, सन १९१९ मध्ये दुसरं विश्वयुद्ध संपल्यानंतर भारतात असंतोष उफाळून येईल, असं ब्रिटीशांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी या असंतोषाला दाबण्यासाठी रौलेट कायदा ( Rowlatt act) देशात लागू केला. या कायद्यांतर्गत देशविरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून कुठल्याही व्यक्तीला चौकशी, पुराव्याशिवाय तुरूंगात टाकता येत होतं. म्हणून या कायद्याला काळा कायदा असंही म्हटलं जात होतं. सीएए हा कायदा देखील अशाचप्रकारचा कायदा आहे. या कायद्याला देखील भविष्यात काळा कायदा म्हणून ओळखलं जाईल, असं उर्मिला म्हणाली.

उर्मिलाच्या या वक्तव्यानंतर सीएए (CAA) विरोधकांनी उर्मिलाच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे, तर या कायद्याच्या समर्थकांनी उर्मिलावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या