निवडणुकीआधी सेनेला राम मंदिर आठवलं

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पुन्हा एकदा हिंदुत्ववादी मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीच्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिकांनी ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ चं होर्डिंग मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात लावले आहेत. दरम्यान हिंदू मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी सेनेची ही खेळी आहे, म्हणूनच 2019 च्या निवडणुका तोंडावर असताना सेनेला राम मंदिर आठवलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

काय आहे या पोस्टमध्ये?

"मला वाराणसीला जाऊन गंगापूजन केल्यानंतर अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यायचे आहे" उद्धव ठाकरेंनी केलेल्या या घोषणेनंतर शिवसेना भवन आणि मातोश्रीच्या बाहेर 'चलो अयोध्या.. चलो वारणसी' चे पोस्टर लावले आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लावलेल्या या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा आहे.

या पोस्टरमध्ये ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी, देशाच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी पाऊल’ असं लिहिण्यात आलं आहे. शिवाय या दौऱ्यात शिवसैनिकांनीही सहभागी व्हावे असं आवाहन या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

'हा सेनेचा डाव'

एकीकडे शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याची भाजपची इच्छा असताना शिवसेनेने मात्र ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच येत्या निवडणुकीत भाजपाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेनं ही रणनिती आखल्याचं समजतं.


हेही वाचा - 

हिंसा नको चर्चा करा- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या