Advertisement

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे


महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच-उद्धव ठाकरे
SHARES

शिवसेनेसोबत युती करत आगामी निवडणुका लढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ''भाजपाच्याच छाताडावर बसून महाराष्ट्रात भगवा फडकवणारच, सेनेचा मुख्यमंत्री बनवणारच'', असा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासमोरच आव्हान उभं केलं आहे. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केवळ स्वबळाचा नाराच दिला नाही, तर स्वबळावर निवडणुका लढत एकहाती सत्ता मिळवण्याचाही निर्धार व्यक्त केला आहे.जिंकल्यावर माजलो नाही

सेनेच्या स्थापनेला ५२ वर्षे झाली या ५२ वर्षांत अनेक सैनिकांनी अपार मेहनत घेतली, रक्त सांडलं, कष्ट केलं, प्रसंगी बलिदान दिलं असं म्हणत सेनेला वाढवणार्या सर्व सैनिकांचे जाहिर आभार उद्धव ठाकरे यांनी यावेळी मानले. तर या ५२ वर्षांत किती लढलो, किती हरलो, किती जिंकलो याचा विचार केला नाही. जिंकल्यावर कधी माजलो नाही अन् हरल्यानंतर निराशही झालो नाही. कारण भिऊ नकोस मी तुझ्या मागे आहे असं आपुलकीनं म्हणणारी अनेक माणसं मागे होती आणि आजही आहेत. हीच माझी खरी माणसं, खरी ताकद असल्याचंही उद्धव म्हणाले.


तयारीला लागा

निवडणुका जवळ आल्या आहेत, केव्हाही निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा तयारीला लागा असं शिवसैनिकांना सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सदस्य नोंदणी वाढवण्याचंही आवाहनही केलं. मोबाइलवर मिस काॅल देत भाजपासारखी सदस्य नोंदणी करणारे सदस्य मला नको, शिवधनुष्य उचलून, माझा पक्ष महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनवणारे सदस्य मर्द शिवसैनिक मला हवेत, असं म्हणत त्यांनी भाजपाच्या सदस्यनोंदणीवरही खोपरखळी मारली. स्वत:हून सदस्य नोंदणी करण्याचंही आवाहानही त्यांनी यावेळी केलं.जम्मू-काश्मीर सोडायला वेळ का?

जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सरकारचा पाठिंबा मंगळवारी भाजपानं काढून घेतल्याच्या मुद्दयालाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी हात घातला. जम्मू-काश्मीरमधलं सरकार किती नालायक आहे हे कळायला भाजपाला साडेतीन वर्षे लागली का? ६०० जवान शहीद झाल्यानंतर हे कळलं का? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरमधून सत्तेतून बाहेर पडण्याच्या भाजपाच्या निर्णयावर जोरदार टीका केली.


मोदी मंगळावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर तबकडी फिरत असल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या. आपल्या घरावर कधी अशी तबकडी फिरली नाही नि फिरणारही नाही. कदाचित पृथ्वीवर बघण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाही, सगळं जग फिरून झालं आहे. तेव्हा एका टुरिस्ट कंपनीनं ही तबकडी पाठवली असेल. उद्या असंही वाचायला मिळेल की मोदी याच तबकडीतून मंगळवार रवाना झालेत, अशी असं बोचरी टीका उद्धव यांनी मोदींवर केली.हेही वाचा-

अागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे

'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा