Advertisement

आधी सगळ्या आॅफर येऊ दे मग ठरवू- उद्धव ठाकरे

निवडणुकीआधी जितक्या ऑफर यायच्या तितक्या येऊ दे. त्यानंतरच विचार करून कुणाबरोबर युती करायची हे ठरवू असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजून तरी शहा यांची आॅफर स्वीकारलेली नाही हे स्पष्ट केलं.

आधी सगळ्या आॅफर येऊ दे मग ठरवू- उद्धव ठाकरे
SHARES

निवडणुका आल्या की युती, महाआघाडी यांची चर्चा सुरु होतेच. अजूनपर्यंत युतीसंदर्भात कोणतीही ऑफर आलेली नाही. त्यामुळे निवडणुकीआधी जितक्या ऑफर यायच्या तितक्या येऊ दे. त्यानंतरच विचार करून कुणाबरोबर युती करायची हे ठरवू असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजून तरी शहा यांची आॅफर स्वीकारलेली नाही हे स्पष्ट केलं.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे वांद्र्यातील रंगशारदा इथं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातून बाहेर येताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं.


अजून 'वेट अँड वाॅच'

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँटे की टक्कर दिल्यानंतर जाग आललेल्या भाजपाने युतीसाठी शिवसेनेची मनधरणी करायला सुरूवात केली आहे. एकाबाजूला अमित शहा यांनी उद्धव यांची मातोश्रीवर भेट घेऊन त्यांना युतीसाठी राजी करण्याचा प्रयत्न केला.

तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील मेळ्याव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवसेनेसोबतच्या आघाडीचा खडा टाकला. यापैकी उद्धव कुणाच्या हाकेला प्रतिसाद देतात, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. पण उद्धव यांनी 'सर्वांच्या आॅफर आल्यावर बघू' असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नांना टाळला. उद्धव यांच्या प्रतिक्रियेवरून भाजपाला अजून 'वेट अँड वाॅच'चं धोरणं स्वीकारावं लागेल, असं स्पष्ट होत आहे.


कामाला लागा

वांद्र्यातील मेळाव्या बोलताना उद्धव यांनी २०१९ ची निवडणूक जिंकण्यासाठी तयार होण्याच्या सूचना केल्या. त्यावरून तरी उद्धव स्वबळाचीच भाषा बोलत असल्याचं दिसत आहे.


काही वेळानेच घुमजाव

सगळ्या आॅफर्स आल्यावरच युतीचं ठरवू, असं उद्धव ठाकरे गमतीने म्हणाले होते. काही प्रसारमाध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण काही वेळातच शिवसेनेकडून आलं. 


हेही वाचा-

शिवसेनेला हवंय मुख्यमंत्रीपद! बंद दाराआडची खेळी

काँग्रेसला हवाय समविचारी पक्षांचा हात!Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement