Advertisement

शहांच्या संपर्काला उद्धव देणार का समर्थन?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मॅरेथाॅन बैठक अखेर २ तासांनंतर संपली. या बैठकीत शहा यांनी काही प्रस्ताव सादर करत उद्धव ठाकरेंना अपेक्षेनुसार युतीचं साकडं घातलं. अाता या प्रस्तावाला उद्धव 'समर्थन' देतात की नाकारतात? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शहांच्या संपर्काला उद्धव देणार का समर्थन?
SHARES

येत्या निवडणुकीत भाजपासोबत युती करायचीच नाही, या भूमिकेवर ठाम असलेल्या शिवसेनेला गोंजारण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मॅरेथाॅन बैठक अखेर २ तासांनंतर संपली. या बैठकीत शहा यांनी काही प्रस्ताव सादर करत उद्धव ठाकरेंना अपेक्षेनुसार युतीचं साकडं घातलं. अाता या प्रस्तावाला उद्धव 'समर्थन' देतात की नाकारतात? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने मित्रपक्षांना गोंजारण्यासाठी सत्ताधारी भाजपाने 'संपर्क फाॅर समर्थन' ही मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले असून मुख्य अजेंड्यानुसार त्यांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. ही भेट सुमारे २ तासांहून जास्त काळ चालली. या भेटीत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. तर उद्धव यांच्यासोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही सोबत होते. त्यातच शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आक्षेप घेतल्याने रावसाहेब दानवे यांना माघारी परतावं लागलं.


चर्चेच्या तीन फेऱ्या

मातोश्रीवर शहा यांच्या स्वागताची औपचारीकता झाल्यावर खऱ्या अर्थाने सुरू झाली मॅरेथाॅन चर्चा. काहीही केलं तरी युतीसाठी उद्धव यांना तयार करायचंच या तयारीनेच जणू शहा मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यासाठी त्यांनी काही प्रस्तावही बनवून आणले होते. या सर्व प्रस्तावावर उपस्थितांमध्ये एकूण तीन फेऱ्यांमध्ये चर्चा करण्यात आली.


बंद दाराआड गुफ्तगू

आधी तळ मजल्यावर युती संदर्भात सर्वसाधारण चर्चा करण्यात आली. त्यानंतर मातोश्रीवरील दुसऱ्या मजल्यावर बंद दाराआड शहा आणि उद्धव यांनी एकदा नव्हे, तर दोनदा २० ते २५ मिनिटे गुफ्तगू केली. बंद दाराआडमागच्या चर्चेत दोघांमध्ये काय खलबतं झाली, याची अधिकृत माहिती सूत्रांकडून उपलब्ध होऊ शकली नाही.


नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

तरी शहा यांनी सादर केलेल्या प्रस्तावात युती कशासाठी महत्त्वाची आहे, युती झाल्यास निवडणुकीचा फाॅर्म्युला अर्थात जागावाटपाचं सूत्र काय असेल, केंद्र आणि राज्यातील मंत्रीपद या विषयांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चर्चेत शहा यांनी उद्धव यांची नाराजी दूर करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून आलं. आता शहा यांच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, यावर युतीची गणितं अवलंबून आहे.



हेही वाचा-

अमित शहा व्यंगचित्रातून राज ठाकरेंकडून टार्गेट

धकधक गर्लला राज्यसभेची आॅफर?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा