Advertisement

अमित शहा व्यंगचित्रातून राज ठाकरेंकडून टार्गेट


अमित शहा व्यंगचित्रातून राज ठाकरेंकडून टार्गेट
SHARES

'संपर्क फॉर समर्थन' च्या माध्यमातून देशातील १ लाख लोकांच्या भेटी घेण्याचा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा संकल्प आहे. यासाठी ते बुधवारी मुंबईतील प्रख्यात व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. याच भेटीगाठींवर अमित शहांना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून टार्गेट केलं आहे.


काय आहे व्यंगचित्रात

अमित शहांच्या हातात ज्यांना भेटायचं अाहे त्यांची एक भली मोठी लिस्ट असल्याचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे. 'बकेट लिस्ट?' अशा शब्दांमध्ये राज यांनी आपल्या ठाकरे शैलीत अमित शहांना टार्गेट केलं आहे. तर अमित शहा बकेट लिस्ट पाहण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना समोर उभा असलेला भाजपाचा कार्यकर्ता दिसतही नाही, असं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांसाठी अमित शहांना वेळ नसल्याचं या यातून त्यांनी दाखवलं अाहे.हेही वाचा -  

धकधक गर्लला राज्यसभेची आॅफर?

रतन टाटांच्या घरी अमित शहा भेटीलासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा