Advertisement

रतन टाटांच्या घरी अमित शहा भेटीला


रतन टाटांच्या घरी अमित शहा भेटीला
SHARES

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी मुंबईत उद्योगपती रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अमित शहा हे 'संपर्क फॉर समर्थन' अभियानातंर्गत देशभरातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. यासाठी शहा बुधवारी मुंबईत आले. दरम्यान, लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नसल्याने शहा यांची त्यांच्यासोबतची भेट रद्द करण्यात अाली.


विकासकामांची पुस्तिका भेट

रतन टाटा यांच्याशी भेटीदरम्यान शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मागील ४ वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. मोदी सरकारने केलेल्या कामांची पुस्तिकाही रतन टाटा यांना भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना शिवाजी महाराजांवरील एक पुस्तक भेट दिले.


हेही वाचा - 

समीर भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर

धकधक गर्लला राज्यसभेची आॅफर?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा