Advertisement

अमित शाह मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री' भेटीचं काय?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नामवंत व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत. याशिवाय आज संध्याकाळी अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र ही भेट रद्द होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर, 'मातोश्री' भेटीचं काय?
SHARES

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नामवंत व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत. याशिवाय बुधवारी संध्याकाळी अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र ही भेट रद्द होणार की काय? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.


'यांची' घेणार भेट

या दौऱ्यादरम्यान ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा, गायिका लता मंगेशकर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेणार आहेत. याशिवाय ते राज्याच्या निवडणूक समितीची बैठक घेणार आहेत. 


बैठकीचा अजेंडा काय?

या बैठकीत ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली तयारी, लोकप्रतिनिधींच्या कामांचा आढावा, उमेदवारांची छाननी, पालकमंत्र्यांचे दौरे, घटक पक्ष आणि विविध संघटनांची स्थानिक पातळीवरची स्थिती या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.


'मातोश्री'भेटीचं काय?

याशिवाय आज अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दौऱ्याच्या वेळापत्रकात ते संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
मात्र ही भेट रद्द होणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. 


अमित शाह यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक

  • दु. 12.30 - माधुरी दीक्षितशी भेट
  • दु. 1.45  - मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृहात विश्रांती
  • दु. 4.30 -  उद्योगपती रतन टाटा यांची भेट
  • संध्या. 5.30 - पेडर रोड इथे गायिका लता मंगेशकर यांची भेट
  • संध्या 6.45 - प्रभादेवी- सिद्धिविनायकाचं दर्शन
  • संध्या 7.00 वा - वांद्रे- आशिष शेलार यांच्या निवासस्थानी भेट
  • संध्या 7.30 वा - मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेणार भेट
  • रा. 9.45 वा - मलबार हिल - सह्याद्री अथितीगृहात मुक्काम

हेही वाचा - 

अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला, युतीसाठी चर्चा होण्याची शक्यता

अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत अादित्य यांचं मौन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा