Advertisement

'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत बांदेकर यांच्या राज्यमंत्री दर्जावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'
SHARES

'होम मिनिस्टर' मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते, शिवसेनेचे सचिव आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर आता खरेखुरे 'मिनिस्टर' होणार आहेत. बांदेकर यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय जाहीर करत भाजपाने नाराज शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काहीही का असेना, पण यातून बांदेकरांना बाप्पा पावल्याचंच दिसून येत आहे.


कोण आहेत बांदेकर?

आदेश बांदेकर यांनी अभिनय क्षेत्रातून पदार्पण केलं असलं, तरी त्यांच्या कारकिर्दीला खरं वळण मिळालं ते 'होम मिनिस्टर' या तुफान यशस्वी झालेल्या मालिकेतून. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर त्यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या त्यांच्याकडे प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचं अध्यक्षपद आहे.


मिळणार 'या' सुविधा

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत बांदेकर यांच्या राज्यमंत्री दर्जावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यामुळे त्यांना आता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या सुविधा मिळणार आहेत.
तर, इतरांना का नाही?

तर २०१४ पासून कायमच ताणले गेलेले भाजपा आणि शिवसेनेचे संबंध या निमित्ताने तरी सुधारतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला शिर्डी संस्थानासारख्या राज्यातील इतर मोठ्या संस्थानांच्या अध्यक्षांना हा दर्जा का नाही? असा सूरही आळवला जात आहे.हेही वाचा-

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताय? करा मोफत बसने प्रवास

आधी सगळ्या आॅफर येऊ दे मग ठरवू- उद्धव ठाकरेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा