Advertisement

व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशनसाठी ‘सिद्धिविनायक’कडून १० कोटी


व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशनसाठी ‘सिद्धिविनायक’कडून १० कोटी
SHARES

राज्यातील खेड्यांच्या परिवर्तनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशन)साठी सिद्धीविनायक गणपती न्यासाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० कोटी रुपयांचा धनादेश दिला. सिद्धिविनायक न्यासातर्फे मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी हा धनादेश विधानभवनातील कार्यक्रमात दिला.


धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

राज्यातील १००० खेड्यांचे रुपांतर आदर्श खेड्यामध्ये करून त्यामध्ये शाश्वत विकासासह ती सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवत आहे. या अभियानाच्या सहाय्यासाठी सिद्धिविनायक न्यासाकडून १० कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं. या अर्थसहाय्याचा धनादेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.


मुख्यमंत्री म्हणाले...

ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी स्थापन करण्यात आलेले ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान फाऊंडेशन हे सरकारी आणि सार्वजनिक भागिदारीतून साकारणारे आगळेवेगळे मंच आहे. या अभियानात सहभागी होणारे सिद्धिविनायक न्यास ही पहिलीच सामाजिक धर्मादाय संस्था आहे. ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी सहभागी झाल्याबद्दल सिद्धिविनायक न्यासचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो, असं मुख्यमंत्र्यानी यावेळी म्हटलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा