सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताय? करा मोफत बसने प्रवास


  • सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताय? करा मोफत बसने प्रवास
  • सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाताय? करा मोफत बसने प्रवास
SHARE

दर सोमवारी रात्री किंवा मंगळवारी प्रभादेवीतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक खूशखबर आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने भाविकांच्या सोईसाठी मोफत बससेवा सुरू केली असून एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर अशी प्रवास भाविकांना या बसमधून करता येणार आहे.याअगोदर देखील अंगारकी आणि गणेश जयंतीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे मोफत बससेवा चालवण्यात येत होती. परंतु आता ही मोफत बस आठवड्यातील प्रत्येक सोमवारी रात्री आणि मंगळवारी चालवण्यात येणार आहे. या बसचं उद्घाटन नुकतंच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.'अशी' असेल वेळ

ही बस दर सोमवारी रात्री १२ वाजेपासून ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत मोफत धावेल. ही बस एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक ते सिद्धिविनायक मंदिर या मार्गावरून धावेल.


सिद्धिविनायक मंदिर येथे प्रत्येक मंगळवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सूचनेचा विचार करून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या मोफत बससेवेचा भाविकांना नक्कीच फायदा होईल. ही बस बेस्ट उपक्रमाकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. या बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन भविष्यात बसची संख्या वाढविण्यात येईल.

- संजीव पाटील, सीईओ, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट

संबंधित विषय
ताज्या बातम्या