Advertisement

अागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे


अागामी निवडणुका स्वबळावरच - अादित्य ठाकरे
SHARES

अागामी लोकसभा अाणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडून शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव अाला असताना अाता शिवसेनेचे युवराज अादित्य ठाकरे यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला अाहे. मंगळवारी शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अादित्य ठाकरे यांनी, अागामी काळात स्वबळावर लढायचं, जिंकायचं आणि एकहाती सत्ता आणायची असं आवाहन शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. स्वबळाच्या घोषणेने शिवसेना भाजपाशी युती करणार नाही, यावर अादित्य यांनी एकप्रकारे शिक्कामोर्तबच केलं. 


एकहाती सत्ता अाणायची

गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात अायोजीत करण्यात अाला होता. या सोहळ्याचे उद्घाटन युवासेना प्रमुख अादित्य ठाकरे यांनी केलं.  अागामी दोन्ही निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता अाणायची अाहे. अाता स्वबळावर लढून जिंकायचं अाहे, असं अादित्य यावेळी म्हणाले.  आजचा दिवस अभिमानाचा आहे. आपण कुठे होतो अाणि कुठे आलो आहोत ते आपल्याला माहित आहे.  ५२ वर्षांत काय झगडावं लागलं आहे याची जाणीव अापल्याला असल्याचंही अादित्य म्हणाले.


शिवसैनिकांचं कौतुक 

आपण कोणाच्या जीवावर मोठे झालो नाही. सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोण करत नाही, शेतकरी, विद्यार्थी, रोजगार यासाठी शिवसेना काम करते. हाडामांसाचे शिवसैनिक आपल्या पक्षात आहेत. त्यांचा रोल म्हत्त्वाचा अाहे. आपण जे कार्य करतोय त्या जनसेवेला मी सलाम करतोय, अशा शब्दात अादित्य यांनी शिवसैनिकांचं कौतुक केलं. आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने निश्चित नवचैतन्य निर्माण होणार असल्याची भावना शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केली.



हेही वाचा -

'आता राजकीय अपघात नकोच, २०१९ स्वबळावरच'

'होम मिनिस्टर' होणार खरेखुरे 'मिनिस्टर'



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा