राणेंचं पुनवर्सन १०० टक्के होणार - मुख्यमंत्री

राणेसाहेब आता आमच्यासोबत आहेत त्यामुळे त्यांचं पुर्नवसन १०० टक्के होणार, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता राणेंचं मंत्रिमंडळातील स्थान निश्चित मानलं जात आहे. काँग्रेसला रामराम करत नारायण राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेनेचा विरोध पत्करून भाजपा राणेंना मंत्रिपद देणार का? अशी चर्चा होती. मात्र मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राणेंचं पुनर्वसन होणार असं सांगितलं.

राणेंना आमच्या कोट्यातून मंत्रीपद 

'शिवसेनेचा विरोधाचा प्रश्नच नाही कारण आम्ही आमच्या कोट्यातून राणेंना मंत्रिपद देतोय' असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. याचसोबत त्यांनी राणेंचं कौतुकही केलं.

राणेंचा पुनर्वसन होणार. ते आमच्यासोबत आहेत. खडसे, राणे आऊटस्पोकन आसण्यापेक्षा त्यांचा अनुभव मोठा असतो. असे लोक असेट असतात. राणेंना आमच्या कोट्यातून घेणार, त्यामुळे शिवसेनेचा विरोधाचा प्रश्न नाही.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा - 

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत


पुढील बातमी
इतर बातम्या