युवाशक्तीचा बाॅम्ब पेटवू नका, ‘जामिया’वरून केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांचा इशारा

देशात जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असून केंद्र सरकारने युवाशक्तीची सहनशक्ती आजमावून पाहू नका, युवाशक्ती म्हणजे बाॅम्ब असून या बाॅम्बची वात पेटवू नका, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

हेही वाचा- जामिया हिंसाचार: कायदा शिकवणाऱ्या जावेद अख्तर यांना आयपीएसने सुनावलं 

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांकडून ज्या पद्धतीने गोळीबार करण्यात आला, त्याकडे पाहता हा जालियनवाला बाग तर नाही ना अशी शंका यावी. युवाशक्ती म्हणजे देशाचं भविष्य मानलं जातं. स्वत: पंतप्रधान आपल्या भाषणांत युवाशक्तीचा उल्लेख करत असतात. तेव्हा या युवकांना बिथरवण्याचा प्रयत्न करू नका. युवाशक्ती म्हणजे बाॅम्ब आहे, त्याची वात पेटवण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. 

हेही वाचा- भाजपचं ‘आयटी सेल’च खरी तुकडे तुकडे गँग, अभिनेत्री रेणुका शहाणेची मोदींवर खरमरीत टीका

नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकरी नुकसान भरपाईवरून मुख्यमंत्र्यांना विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मागील सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारकडे साडेपंधरा हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एकही पैसा अजून मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने जीएसटीच्या परताव्याची थकीत १५ हजार कोटी रुपयांची रक्कम केंद्राकडे मागितली. त्याचा पहिला हप्ता राज्याला मिळाला आहे. त्यापैकी ३ हजार कोटी रुपयांहून जास्त रकमेचं वितरण शेतकऱ्यांमध्ये करण्यात आलेलं असून अजून काही रक्कम नुकसान भरपाईसाठी देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे विरोधकांनी इथं गळे काढण्यापेक्षा भाजपचं सरकार असलेल्या केंद्र सरकारपुढे निधी मिळवण्यासाठी त्याचा वापर करावा, असे खडेबोलही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले.   

पुढील बातमी
इतर बातम्या