coronavirus updates: तर, नाईलाजाने कारवाई करावीच लागेल- राजेश टोपे

राज्य सरकार सातत्याने लोकांना गर्दी करू नका, असं आवाहन करत आहे. कोरोना व्हायरचा (Coronavirus) संसर्ग टाळायचा असेल, तर सोशल डिस्टंसिंग मेंटेन करणं आवश्यक आहे. पण आवाहन करूनही लोकं ऐकणार नसतील, तर त्यांच्यावर नाईलाजानं कारवाई करण्यात येईल, त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी सोमवारी दिला. 

हेही वाचा- Corona Virus: मोठी बातमी, महाराष्ट्राच्या सीमा बंद!

दोन जण आयसीयूत

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाग्रस्तांची (COVID-19) माहिती माध्यमांना दिली. राज्यात कोरोनाबाधीतांचा आडका १५ ने वाढून रुग्णांची संख्या ८९ वर गेली आहे. या १५ रुग्णांपैकी ८ जणांना संपर्कामुळे लागण झाली असून ६ लोक परदेशातून आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अजूनही कम्युनिटीमध्ये अर्थात समाजात हा व्हायरस पसरलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्या व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला ती व्यक्ती पोलंडहून आली होती. सुरूवातीला कस्तुरबा आणि नंतर एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. सद्यस्थितीत मुंबईचा आणि पुण्याचा प्रत्येकी एक रुग्ण आयसीयूमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांना अधिकार

कोरोनाबाधीतांचा आकडा वाढला असला तरी घाबरण्याचं कारण नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचचत आहेत. त्यासाठी सरकारला सहकार्य करणं ही काळाची गरज आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी (ipc section 144) लागू करण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस आणि अन्य विभाग काम करत आहेत. पण अनावश्यक गर्दी केल्याच नाईलाजाने सरकारला कडक पावलं उचलून कारवाई करावी लागेल. तसे अधिकार पोलिसांना कायद्याद्वारे मिळालेले आहेत, असं टोपे म्हणाले. 

हेही वाचा- Lock Down ने भागेल असं वाटत नाही, संचारबंदी कराच, मुख्यमंत्र्यांना आवाहन

सध्या आपण राज्याच्या काही सीमा आपण सील करत आहोत. पोलिसांना तसं सांगण्यात आलं आहे. जनतेनं जमावबंदीचे आदेशाचं पालन करावं, कोणत्याही परिस्थितीत सर्वांच्या आरोग्यासाठी हे करणं आवश्यक आहे. लोकांनी न ऐकल्यास कारवाई करावी लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या