Advertisement

Lock down ने भागेल असं वाटत नाही, संचारबंदी कराच, मुख्यमंत्र्यांना आवाहन

सरकारच्या आवाहनाला गांभीर्याने न घेता, लोकं चक्क सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर पडले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला असून सरकारने सक्तीची संचारबंदी लागू करावी, या मतापर्यंत काहीजण येऊन पोहोचले आहेत.

Lock down ने भागेल असं वाटत नाही, संचारबंदी कराच, मुख्यमंत्र्यांना आवाहन
SHARES

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदीचं कलम १४४ लागू केलं आहे. शिवाय लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहनही सातत्याने करण्यात येत आहे. परंतु या आवाहनाला गांभीर्याने न घेता, लोकं चक्क सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बाहेर पडले आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला असून सरकारने सक्तीची संचारबंदी लागू करावी, या मतापर्यंत काहीजण येऊन पोहोचले आहेत. 

 हेही वाचा - बेपर्वाई! आचारसंहिता मोडून मुंबईकर रस्त्यांवर! दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

राज्य सरकारने अन्नधान्य, भाजीपाला, दूध, वीज, पाणी, बँका इ. अत्यावश्यक सेवा वगळता, ट्रेन, बस, आॅफिस, दुकाने अशा सर्व सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय लोकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये म्हणून कलम १४४ लागू (section 144) करत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरण्याची मनाई देखील करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वत: हून जनता कर्फ्यू पाळण्याचं लोकांना आवाहन केलं होतं. त्याचं लोकांनी योग्य रितीने पालन केलं असलं, तरी दुसऱ्याच दिवशी लोकांनी घराबाहेर पडून पुन्हा एकदा गर्दी करायला सुरूवात केली आहे.

याची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेत ट्विट केलं आहे. अनेकजण लाॅकडाऊनला गंभीरपणे घेत नसून लोकांनी घरातच राहिलं पाहिजे. राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी देखील घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करू नका, स्वत: चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असं म्हटलं आहे. 

 

मात्र लोकांना केवळ आवाहन करून भागत नसून आता सक्तीने संचारबंदी लागू करण्याची वेळ आली आहे, असं मत राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (state housing minister jitendra awhad) यांनी केलं. आपल्या ट्विटर हँडलवर रस्त्यावरील वाहतुकीचे फोटो अपलोड करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना तशी विनंतीच केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, परिस्थिती गंभीर आहे. कोरोना बाधीतांची संख्या ८९ झाली आहे. सरकारचं आवाहन लोकं गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव मी स्वत: फिरुन घेतला आहे. लोकं ऐकत नसल्याने संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे, असं मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणत आहेत. 

 हेही वाचा - Coronavirus Updates: महाराष्ट्र लाॅकडाऊन! ५ हून अधिकजण रस्त्यावर फिरु नका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा