Advertisement

बेपर्वाई! संचारबंदी मोडून मुंबईकर रस्त्यांवर! दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

सोमवारी सकाळी बहुसंख्य मुंबईकर नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असूनही मुंबईकरांनी खासगी गाड्यांनी प्रवास सुरू केला. या बेपर्वाईमुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

बेपर्वाई! संचारबंदी मोडून मुंबईकर रस्त्यांवर! दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
SHARES

गर्दीमुळे कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग पसरू नये म्हणून राज्य सरकारने अखेर महाराष्ट्रात भादंवि कलम १४४ अंतर्गत (Section 144) संचारबंदी लागू केली आहे. मात्र या आचारसंहितेला गांभीर्याने न घेता, सोमवारी सकाळी बहुसंख्य मुंबईकर नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असूनही मुंबईकरांनी खासगी गाड्यांनी प्रवास सुरू केला. या बेपर्वाईमुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. 

गर्दी करू नका

यामुळे नाईलाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पुन्हा एकदा आवाहन करावं लागलं. कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली.

पंतप्रधानांचं आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा (COVID-19) प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्यानुसार रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुंबईसह देशभरात या जनता कर्फ्यूचं तंतोतंत पालन केलं. सोबतच अत्यावश्यक सेवाची वाहतूक वगळत राज्य सरकारने एसटी, बेस्ट बससेवा लोकल ट्रेन, मेट्रो, मोनो सेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. राज्यभर कलम १४४ देखील लागू करण्यात आलं. त्यामुळे कधीही न थांबलेली मुंबई पहिल्यांदाच थांबल्याचं चित्र दिसलं. 

'इथं' झाली गर्दी

परंतु सोमवारची सकाळ उजाडताच मुंबईकर पुन्हा घराबाहेर पडले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पडली असली, तरी खासगी गाड्यांनी रस्त्यांवर नेहमीसारखी केली. काही मुंबईकर आॅफिसला तर काही मुंबईबाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले. यामुळे पश्चिम, पूर्व द्रुतगती महामार्गांसोबतच मुंबईतील महत्त्वांच्या रस्त्यावर गाड्यांची वर्दळ दिसू लागली. मुलुंड टोलनाका, सायन, ऐरोली टोलनाक्यावर सकाळच्या सुमारास वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा