Video: ‘खिसा अजून गरम व्हायचाय’, वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर ट्रोल

‘मी आताच मंत्री झाले आहे, खिसा अजून गरम झालेला नाही,’ असं वक्तव्य करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशाेमती ठाकूर यांची काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कामरगा येथील जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात यशोमती ठाकूर सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाषण करताना ‘मी आताच मंत्री झाले आहे, खिसा अजून गरम झालेला नाही,’ परंतु पक्षप्रमुखांना सांगून तुमची कामं करून घेते,’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीकाही होत आहे. 

हेही वाचा- मनसे लोणच्याएवढीही उरली नाही, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर टीका

हीच क्लिप शेअर करत निरूपम यांनी ट्विटरवरून ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. या आपल्या मंत्रीबाई, ज्या असं वक्तव्य करून स्वत:सोबत पक्षाचीही बदनामी करत आहेत. याच दिवसासाठी सगळ्यांनी पक्षावर दबाव टाकून सत्तेत सहभागी व्हायला लावलं होतं का असा प्रश्न संजय निरूपम यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचे सरकार गुडीपाडव्यापर्यंतच

 
पुढील बातमी
इतर बातम्या