Advertisement

उद्धव ठाकरेंचं सरकार गुडीपाडव्यापर्यंतच

मुनगंटीवाराच्या या विधानांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो.

उद्धव ठाकरेंचं सरकार गुडीपाडव्यापर्यंतच
SHARES

विधानसभा निवडणूकीचा निकाल उलटून महिन्याभरानंतर आता उद्धव ठाकरेंचे सरकार अखेर स्थापन झाले. खातेवाटपाची यादी जाहीर होताच अनेक नेत्यांनी मनासारखं खातं न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. त्यातच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या वावड्या उठल्या, या सर्व बाबींवर लक्ष साधत भाजपने आता उद्धव ठाकरेंच्या सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टिका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. यांनी नुकत्याच केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "मतभेदांमुळेच नवं सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही." तसेच, गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

हेही वाचाः- ‘मनसे’ पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार?

सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी आता भाजप नेत्यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. मुनगंटीवाराच्या या विधानांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो. तसेच या दाव्यावरून असेही दिसून येते की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या नाराज कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा