Advertisement

‘मनसे’च्या झेंड्याचा रंग बदलणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या झेंड्याचा रंग बदलणार असून, नव्या झेंड्यामध्ये भगव्या रंगाचा झेंडा होणार असल्याचं माहिती समोर येत आहे.

‘मनसे’च्या झेंड्याचा रंग बदलणार?
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ओसरता प्रभाव आणि राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल करण्याची तयारी चालवल्याची माहिती समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या झेंड्याचा रंग बदलणार असून, नव्या झेंड्यामध्ये भगव्या रंगाचा झेंडा होणार असल्याचं माहिती समोर येत आहे.

पक्षांतर्गत विचारविनिमय

मनसेच्या झेंड्याचा रंग बदलण्यावर पक्षांतर्गत विचारविनिमय झाला आहे. मनसेचा झेंडा आता भगवा किंवा केशरी रंगाचा असणार आहे. एवढेच नाहीतर झेंड्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देखील असणार असल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच या नव्या झेंड्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसे आपल्या नव्या रंगातील झेंड्याचं अनावरण करणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेचे महाअधिवेशन

रंग बदलाच्या पार्श्वभूमीवर मनसे आता मराठीच्या मुद्यावरून हिंदुत्वाच्या मुद्याकडं वळणार की काय? असा देखील प्रश्न अनेकांना पडत आहे. सध्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा व हिरवा असे तीन रंग आहेत. २३ जानेवारी रोजी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे. यावेळी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

झेंड्याचा रंग बदलणार

मनसेचा झेंड्याचा रंग बदलणार असल्यानं राज्यभरातील कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. झेंडा कसा असणार कसा दिसणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या असून, या झेंड्याच्या रंगाच्या बदलामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.



हेही वाचा -

हँकॉक पुलाच्या पुनर्बाधणीला मिळणार गती

खातेवाटप जाहीर; अजित पवारांकडे अर्थ, अनिल देशमुखांकडे गृह



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा