Advertisement

हँकॉक पुलाच्या पुनर्बाधणीला मिळणार गती

मध्य रेल्वे मार्गावरील जून्या हँकॉक पुलाच्या पुनर्बाधणीला आता गती मिळणार आहे.

हँकॉक पुलाच्या पुनर्बाधणीला मिळणार गती
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील जून्या हँकॉक पुलाच्या पुनर्बाधणीला आता गती मिळणार आहे. माझगाव येथील बहुचर्चित हँकॉक पुलाची पुनर्बाधणी गेल्या दोन वर्षांपासून रखडली होती. सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल धोकादायक ठरवून जानेवारी २०१६ मध्ये मध्य रेल्वेनं पाडला होता. रेल्वेच्या हद्दीत गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं मान्यता दिली आहे. रेल्वेच्या जागेत बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्याकरिता अंतिम मंजुरीसाठी रेल्वे सुरक्षा आयोगाला (सीआरएस) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच रेल्वे हद्दीतील पुलाचं काम सुरू करण्यात येणार आहे.

अपघातांच्या प्रमाणात वाढ

हँकॉक पूल पाडल्यामुळं ट्रॅक ओलांडताना अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळं हा पूल लवकरात लवकर बांधावा अशी मागणीनं जोर धरला होता. महापालिका प्रशासनानं पहिल्यांदा निविदा काढून जे कंत्राटदार नेमले होते ते रस्ते घोटाळ्यातील दोषी निघाले. त्यामुळं या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं हे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं फेरनिविदा काढण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. त्याच दरम्यान जीएसटी लागू झाल्यानं पुन्हा प्रशासनाला फेरनिविदा काढाव्या लागल्या.

४१ कोटी खर्च

महापालिका ४१ कोटी खर्च करून हा पूल उभारणार आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. पण या कामामध्ये जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, रेल्वेच्या जागेतील अतिक्रमण आदी अडथळे आल्यानं कामाला गती मिळत नव्हती. रेल्वेच्या जागेतील ३९ बांधकामांचं एप्रिल २०१९ मध्ये पुनर्वसन करण्यात आलं. त्यानंतर रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंस काम करण्यात आलं.

कामाला मंजुरी

रेल्वे मार्गावर गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेच्या पूल विभागाशी महापालिकेनं पत्रव्यवहार केला. ३० डिसेंबर २०१९ ला रेल्वेच्या प्रमुख अभियंत्यांनी या कामाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयोग यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

ओव्हरहेड वायर स्थलांतर

जानेवारी महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हँकॉक पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याचा दावा महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. पुलाचं बांधकाम करताना पुलाखालून जाणारी ओव्हरहेड वायर स्थलांतरण करण्यासाठी रेल्वेला सुमारे ३९ कोटी ३ लाख रुपये महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्याचं पूल विभागानं स्थायी समितीला सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.



हेही वाचा -

मुंबईतील नागपाडा परिसरातील इमारतीला आग

जेएनयूमधील हल्ल्याचे मुंबई, पुण्यात पडसाद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा