Advertisement

नागपाडा परिसरातील इमारतीला आग, ५ जण जखमी


नागपाडा परिसरातील इमारतीला आग, ५ जण जखमी
SHARES

नागपाडा येथील चायना बिल्डिंगला आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

या आगीत आदिल कुरेशी (वय २०), निशा देवी (वय ३२), चंदादेवी (वय ६०), अनिया (वय २), मोहनराम (वय ७०) जखमी झाले आहेत. त्यापैकी मोहनराम यांची प्रकृती गंभीर आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागपाडा येथील चिनॉय या इमारतीला आग लागली आहे. अग्नी शमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ४ फायर इंजिन, २ पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल करण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा