राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी २० हजार कोटी द्या, अशोक चव्हाणांची केंद्राकडे मागणी

राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Pwd minister ashok chavan) यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

नितीन गडकरी यांनी देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सचिव यांच्याशी दिल्ली इथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्राच्या वतीने अशोक चव्हाण चर्चेत सहभाग घेतला होता. यावेळी चव्हाण यांनी राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणींची माहिती नितीन गडकरी (road transport minister nitin gadkari) यांना दिली.

हेही वाचा - निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना ३ महिन्यांचं अनुदान अॅडव्हांस देणार

या  बैठकीत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे (national highway) काम करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी. त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील निधीची कमतरता दूर करण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गांसाठी द्यावा,” अशी मागणी अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरींकडे केली.

“राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असलं, तरी अनेक ठेकेदार वेळेवर काम करत नाहीत. परिणामी महामार्गाचं बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू राहतं. त्यामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वेळेवर काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांचे ठेके रद्द करावेत आणि त्यांना काळ्या यादीत टाकावं,” अशीही मागणी अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

“महाराष्ट्रातील अंकलेश्वर-चोपडा-ब्राहणपुर-देवराई-शेवगांव-नेवासा-संगमनेर, कोल्हापूर-महाबळेश्वर-शिरूर, सागरी मार्ग-खोल-अलिबाग-रत्नागिरी-वेंगुरला-रेड्डी-गोवा या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाची मान्यता देण्यात यावी,” अशीही मागणीही चव्हाण यांनी केली.

हेही वाचा - कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी १०० एसटी बसची व्यवस्था
पुढील बातमी
इतर बातम्या