Advertisement

कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी १०० एसटी बसची व्यवस्था

लाॅकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा इथं अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून या विद्यार्थ्यांसाठी जवळपास १०० एसटी बसची व्यवस्था करण्यात येईल, अशी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माहिती दिली.

कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी १०० एसटी बसची व्यवस्था
SHARES

लाॅकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा इथं अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून या विद्यार्थ्यांसाठी जवळपास १०० एसटी बसची व्यवस्था करण्यात येईल, अशी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माहिती दिली.   

जवळपास १८०० विद्यार्थी

आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथं जातात. त्यानुसार हे विद्यार्थी गेलेले असतानाच लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इतर राज्यांतील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील जवळपास १८०० विद्यार्थी कोटामध्ये अडकून पडले. या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी सातत्याने पालकांकडून होत असल्याने तसंच इतर राज्यांनी आपापल्या विद्यार्थ्यांना बस पाठवून परत आणल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली होती. तसंच केंद्र सरकारला पत्र देखील पाठवलं होतं. 

हेही वाचा - कोटा शहरात अडलेल्या महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थ्यांना परत आणणार 


धुळ्यातून सुटणार बस

त्यानुसार या विद्यार्थ्यांना परत आणण्याची व्यवस्था केली जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांना कोटामधून परत आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार राज्य परिवहन विभागाच्या जवळपास १०० बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी कोटा इथं जातील. या बस धुळे इथून सोडण्यात येतील. महाराष्ट्रात परत आणल्यानंतर या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येईल. येत्या २ दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

एका बससाठी २ ड्रायव्हर

धुळे ते कोटा असा लांबचा प्रवास असल्याने एका बस चालकावर ताण येऊ नये, यासाठी बसमध्ये दोन चालक असतील. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एसटीच्या काही विभागातील चालकांना या स्पेशल ड्युटीसाठी बोलावण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना परत आणताना आरोग्य सुरक्षा, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे पालन करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा - यूपीत साधुंची हत्या, मुख्यमंत्र्यांनी केला योगींना फोन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा