मोहम्मद शमीच्या पत्नीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीनने मॉडेलींगनंतर आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी हसीनने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी हसीनचं पक्षात स्वागत केलं आहे.

ट्विटरवरून माहिती

मुंबई काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरून हसीनच्या काँग्रेस प्रवेशाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. हसीनचे काँग्रेस परिवारात स्वागत आहे, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मॅच फिक्सींगचा आरोप

पेशाने मॉडेल आणि चिअरलीडर असलेल्या हसीनने पती मोहम्मद शमीविरोधात मारहाण केल्याचा तसंच तरुणीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. एवढंच नव्हे, तर शमीने मॅच फिक्सींग केल्याचाही आरोप तिने केला होता. फिक्सिंगबाबतच्या आरोपाची शहनिशा केली असता त्यामध्ये कोणतंही तथ्य आढळून आलं नव्हतं.

हेही वाचा-

बीसीसीअायच्या करारातून मोहम्मद शमीला वगळले

पुढील बातमी
इतर बातम्या