Advertisement

बीसीसीअायच्या करारातून मोहम्मद शमीला वगळले


बीसीसीअायच्या करारातून मोहम्मद शमीला वगळले
SHARES

भारतीय क्रिकेटपटू मालामाल होत चाललेत, याचं ताजं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं या वर्षासाठी खेळाडूंसाठी केलेले करार. बीसीसीअायनं अाॅक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या वर्षासाठी खेळाडूंना करारबद्ध केलं असून या वर्षी A+ ही नवी श्रेणी सादर केली अाहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या कराराच्या यादीतून वगळण्यात अाल्यानं सर्वांनाच धक्का बसला अाहे. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने अापल्या नवऱ्यावर अनैतिक संबंध अाणि मारपीट केल्याचे अारोप केले होते. त्यानंतर शमीची बीसीसीअायच्या करारातून गच्छंती करण्यात अाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या अाहेत.


पाच क्रिकेटपटूंना मिळणार वर्षाला ७ कोटी

या वर्षीपासून नव्यानेच सादर करण्यात अालेल्या A+ श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला ७ कोटी रुपयांचे मानधन मिळणार अाहे. यापूर्वी A, B, C या तीनच श्रेणी होत्या. A+ श्रेणीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार अाणि जसप्रीत बुमरा या पाच क्रिकेटपटूंचा समावेश अाहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मात्र या श्रेणीत स्थान मिळाले नाही.


A श्रेणीतील खेळाडूंना मिळणार ५ कोटी

A श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला ५ कोटी रुपये मिळणार असून या श्रेणीत रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी अाणि वृद्धिमन साहाचा समावेश अाहे. गेल्या वर्षी A श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला २ कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी अाणि C श्रेणीतील क्रिकेटपटूंना ५० लाख रुपये मिळत होते.


B अाणि C श्रेणीत कोण?

B श्रेणीत लोकेश राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, दिनेश कार्तिक यांचा समावेश असून त्यांना वर्षाला २ कोटी रुपये मिळणार अाहेत. C श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला १ कोटी रुपयांचे मानधन मिळणार असून त्यात केदार जाधव, मनीष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल अाणि जयंत यादव यांचा समावेश अाहे. मुंबईकर शार्दूल ठाकूर अाणि श्रेयस अय्यर हे भारतीय संघाचा एक भाग असले तरी त्यांना मात्र या करारात स्थान देण्यात अाले नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा