जुने दिवस आठवले, अजित पवारांचा भाजपला टोला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (maharashtra assembly budget session) पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफीच्या (farmers loan waiver scheme) मुद्द्यावरून भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीला (maha vikas aghadi government) चांगलंच धारेवर धरलं. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून भाजपने आंदोलनही केलं. त्यावरून भाजपचं आंदोलन बघून मला जुने दिवस आठवल्याचा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy cm ajit pawar) यांनी काढला. 

हेही वाचा-

अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis), चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यासह भाजपचे सर्वच प्रमुख नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देत सरकारने शेतकऱ्यांना फसवल्याचं म्हणत भाजपने (bjp) निषेधाच्या घोषणा दिल्या आणि निषेधाचे फलकही झळकावले. 

यासंबंधात अजित पवार (ajit pawar) यांना विचारलं असता, लोकशाहीत आंदोलन अधिकार प्रत्येकाला आहे. आम्हीही विरोधी पक्षात असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनं करायचो, घोषणाबाजी करायचो. काल भाजपच्या (bjp) लोकांना पाहून आम्हाला मागचे दिवस आठवले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे मिळून मिसळून काम करणारे आहेत. विरोधकांना त्यांच्याशी चर्चा करता येऊ शकते. सभागृहात विविध आयुधं वापरून प्रश्न मांडता येऊ शकतात. अधिवेशनात विरोधी पक्षाकडून कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही अजित पवारांनी व्यक्त केली.

हेही वाचा-

कर्जमाफी योजनेसंदर्भात (farmers loan waiver scheme) माहिती देताना ते म्हणाले की, सध्या येत्या कर्जमाफीचा पहिला टप्पा लागू करण्यात आला आहे. या टप्प्याअंतर्गत १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अडीच लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळेल. कर्जमाफीची प्रक्रिया पुढील २ ते ३ महिन्यांत पूर्ण होईल,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या