Advertisement

‘हिशोब' मांडावाच लागेल, आदित्य ठाकरेंना मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा

पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प (tourism budget) असावा, अशी अपेक्षा व्यक्त करणारे आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे (mns leader shalini thackeray) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

‘हिशोब' मांडावाच लागेल, आदित्य ठाकरेंना मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा
SHARES

पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प (tourism budget) असावा, अशी अपेक्षा व्यक्त करणारे आदित्य ठाकरे यांच्या विधानाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे (mns leader shalini thackeray) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आतापर्यंत मनसेकडून महाविकास आघाडी (Maha vikas aghadi) सरकारवर अनेकदा टीका करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांच्यावर वैयक्तीक टीका पक्षाकडून करण्यात नव्हती आली. या निमित्ताने पहिल्यांदाच मनसेकडून ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर निशाणा साधण्यात आला आहे. 

हेही वाचा- सरपंचाची निवड ग्राम सदस्यांमधून होणार, राज्यपालांच्या नकारानंतरही विधेयक मंजूर

आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील ‘संस्कृती आर्ट फेस्टिव्हल’ला सोमवारी भेद दिली. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांनी नाईट लाइफच्या (night life in mumbai) प्रतिसादाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बोलताना आदित्य म्हणाले, नाईट लाइफला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय, याचा आढावा घेतल्यानंतरच हा प्रयोग ठाण्यातही राबवता येईल की नाही, हे ठरवता येईल. आधी पर्यटन विभागात म्हणावा तसा उत्साह नव्हता. परंतु या विभागाची सूत्रे मी हाती घेतल्यापासून या विभागाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. राज्यात पर्यटन वाढीसाठी वेगळा अर्थसंकल्प (tourism budget) असावा, अशा मागण्या अनेक आमदारांनी माझ्याकडे येऊन केल्या आहेत, त्यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, असं मत व्यक्त केलं.

यावरून टीका करत मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे (mns leader shalini thackeray) यांनी आदित्य ठाकरे यांचं लक्ष महिलांच्या समस्येकडे वळवलं आहे. ट्विटवर लिहिलेल्या आपल्या मॅसेजमध्ये त्या म्हणतात, व्वा रे व्वा! तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार, त्या खात्याचा 'वेगळा' अर्थसंकल्प तुम्हाला आवश्यक वाटतो! पण महिलांच्या न्याय्य अधिकारांबाबत विशेष अर्थसंकल्प, जेंडर बजेट (gender budget) सादर करून त्वरित अंमलबजावणी करणं तुम्हाला गरजेचं वाटत नाही! तुमच्या या 'अनास्थेचा हिशोब' महिलांना मांडावाच लागेल.

हेही वाचा- शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, १५,३५८ लाभार्थ्यांचा समावेश

असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा