'लूक अ लाईक' बाळासाहेब!

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव उच्चारलं, तरी तमाम शिवसैनिकांच्या धमण्यातलं रक्त उसळी मारू लागतं. बाळासाहेब हयात नसले, तरी विचारांमध्ये कायम असल्याची भावना शिवसैनिक सदैव बाळगून असतात. त्यातच एक व्यक्ती अशीही आहे, जी शिवसेनेच्या कुठल्या कार्यकारिणीत वा कुठल्या पदावर नसूनही शिवसैनिकांना प्रेरीत करते. या व्यक्तीचं नाव आहे, देवदत्त भट. तुम्ही म्हणाल कोण आहे देवदत्त भट? आणि ते कशाच्या आधारे शिवसैनिकांना प्रेरित करतात? यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे देवदत्त हुबेहुब बाळासाहेबांसारखे दिसतात...

२३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती असल्याने शिवसैनिक बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात देवदत्त यांनाही आवर्जून निमंत्रण देतात.

कोण आहेत देवदत्त भट?

देवदत्त भट हे कुर्ल्याला राहतात. ते पेशाने व्यावसायिक असून बाळासाहेबांच्या विचारांनी त्यांच्यावरही गारूड केलेलं आहे. इतकं की त्यांनी राहत्या इमारतीचं नावही 'मातोश्री' असं करून घेतलं आहे.

वेशभूषा करण्यास कधी सुरूवात?

देवदत्त भट मागील २६ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पण ५ वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांना एका मित्राने ते बाळासाहेबांसारखे दिसत असल्याचं सांगितलं, तेव्हापासून त्यांनी बाळासाहेबांसारखा पेहराव करण्यास सुरूवात केली.

करायचा आहे महाराष्ट्र दौरा

देवदत्त शिवसेनेत साधे कार्यकर्ता असले, तरी महाराष्ट्राचा दौरा करून तमाम शिवसैनिकांना मराठी माणसांसाठी काम करण्याकरीता प्रेरित करण्याची इच्छा असल्याचं ते सांगतात.


हेही वाचा-

जन्मदिन विशेष - बाळासाहेब...एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व!

शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार


पुढील बातमी
इतर बातम्या