Advertisement

शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार


शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार
SHARES

सत्तेतील भागीदार भाजपासोबतचे संबंध बिघडूनही खिशातील राजीनामे बाहेर न काढता २०१९ मध्ये येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दमात घेतलं. राज्यातील निवडणूक लढवण्यासोबतच यापुढे देशातल्या प्रत्येक राज्यातील निवडणूक लढवण्याची घोषणा करत उद्धव यांनी शिवसेना नेत्यांपुढे पक्षाच्या वाटचालीचा रोडमॅप ठेवला. 

   


ठरावाला एकमताने मंजूरी

मंगळवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात झाली. या बैठकीत २०१९ मध्ये शिवसेना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढेल, असा ठराव शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मांडला. या ठरावाला राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने मंजूरी दिली.


नव्या कार्यकारिणीची घोषणा

या बैठकीत शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची देखील घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीत यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.



तत्पूर्वी ४ डिसेंबर, २०१७ रोजी 'मातोश्री' निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी (शिवसेना नेते)च्या बैठकीचा इतिवृत्तांत प्रतिनिधी सभेसमोर मांडण्यात आला. या इतिवृत्तांताला कार्यकारिणीने तात्काळ मंजुरी दिली. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देत शिवसेनेने भाजपाविरोधात आतापासूनच रणशिंग फुंकल्याने भाजापाची त्यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा-

घराणेशाही नव्हे, परंपरा... सेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा