Advertisement

घराणेशाही नव्हे, परंपरा... सेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड


घराणेशाही नव्हे, परंपरा... सेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड
SHARES

ही घराणेशाही नव्हे, तर ठाकरे कुटुंबांची परंपरा असल्याचं म्हणत शिवसेना कार्यकारिणीच्या निवडणुकीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा मंगळवारी सकाळी वरळी येथील वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात झाली. यावेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. नेतेपदाची सूत्रे आदित्य यांच्याकडे अधिकृतरित्या सोपवण्यात आल्यावर कार्यकर्त्यांनी सभागृहात एकच जल्लोष केला.

कार्यकारिणीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचं नेतेपद कायम ठेवण्यात आलं आहे. शिवसेनेत सध्या ८ नेते आणि ३१ उपनेते आहेत. आदित्य ठाकरेंव्यतिरिक्त कोणालाही नेतेपद देऊ नये, अशी मागणी शिवसेनेतील एका गटाने केली होती. तरीही एकनाथ शिंदे यांना नेतेपद देण्यात आलं आहे.


'हे' आहेत शिवसेनेच्या कार्यकारिणीतील १३ नेते :

  • मनोहर जोशी
  • सुधीर जोशी
  • लिलाधर डाके
  • दिवाकर रावते
  • संजय राऊत
  • रामदास कदम
  • गजानन किर्तीकर
  • सुभाष देसाई


'हे' आहेत नवनियुक्त ५ नेते 

  • आदित्य ठाकरे
  • एकनाथ शिंदे
  • चंद्रकांत खैरे
  • आनंदराव अडसूळ
  • अनंत गीते


शिवसेना सचिव

  • मिलिंद नार्वेकर
  • सूरज चव्हाण


पक्ष प्रवक्ते

  • अरविंद सावंत
  • निलम गोऱ्हे
  • मनिषा कायंदे
  • अमोल कोल्हे
  • अनिल परब



हेही वाचा-

शिवसेनेचा भाजपाला दम, २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा