छगन भुजबळ केईएम रूग्णालयात दाखल

मनी लॉड्रिंग प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जे. जे. रूग्णालयातून केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना केईएम रुग्णालयातील गॅस्ट्रोलॉजी विभागात ठेवण्यात आलं आहे. तसंच, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट नसल्याने केईएममध्ये

छगन भुजबळ गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना जे. जे रूग्णालयात गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट नसल्याने केईएममध्ये नेण्यात आल्याचं कळतंय. केईएमच्या वार्ड ४३ मध्ये छगन भुजबळ यांना ठेवण्यात आलं आहे.

प्रकृतीमध्ये सुधार

पण, आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

शिवाय, भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचाही आजार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षीही प्रकृती अस्वास्थामुळे भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात दाखल केलं होतं.

कोर्टाच्या आदेशानुसार छगन भुजबळांना इथे आणण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय


हेही वाचा

छगन भुजबळांना आता सिडकोकडूनही दणका

पुढील बातमी
इतर बातम्या