Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

छगन भुजबळ पुन्हा रुग्णालयात, प्रकृती स्थिर


छगन भुजबळ पुन्हा रुग्णालयात, प्रकृती स्थिर
SHARES

मनी लाँड्रिंगप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा तब्येत बिघडल्याने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोटदुखी आणि दम्याचा त्रास होऊ लागल्याने छगन भुजबळ यांना जे. जे रुग्णालयातील सीसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


शनिवारी उपचारांसाठी दाखल

छगन भुजबळ यांना शनिवारी अचानक पोटदुखी, मधुमेह आणि दम्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ भायखळ्याच्या आर्थर रोड तुरुंगातून जे. जे रुग्णालयात नेण्यात आलं. आधी त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. पण, प्रकृती नाजूक झाल्यामुळे त्यांना सीसीयूत हलवण्यात आलं. पण, आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं जे. जे. रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


अन्ननलिकेचा आजार

भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचाही आजार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षीही प्रकृती अस्वास्थामुळे भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा