स्टॅच्यू ऑफ युनिटी' च्या अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या स्मारकाचं ३१ ऑक्टोबर रोजी अनावरण होणार अाहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात अालं अाहे. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पटेल यांनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची माहिती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याचा इतिहास सांगणारं पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट दिलं.

सर्वात ऊंच पुतळा

देशातील एकता आणि अखंडतेचे शिल्पकार असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'  हे भव्य स्मारक उभारण्यात अालं अाहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात ऊंच पुतळा आहे. हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. १५ हजार पर्यटक एका दिवशी भेट देऊ शकतील एवढ्या भव्य जागेत हे स्मारक उभारलं अाहे.  या स्मारकापासून ८किलोमीटर अंतरावर असलेल्या फ्लाॅवर व्हॅली या ठिकाणी सरदार पटेल यांची जीवनगाथा लेझर शोद्वारे दाखविली जाईल.


हेही वाचा -

शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीने हल्ला, थोडक्यात बचावले

मागास प्रवर्गातील पदोन्नतीला स्थगिती; तर खुल्या प्रवर्गात पदोन्नती


पुढील बातमी
इतर बातम्या