शरद पवारांची पुढची भूमिका काय असणार?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. 

"कोणी काही दावा करेल, पण त्याला काही अर्थ नाही. माझा लोकांवर विश्वास असून उद्यापासून मी दौरा करणार आहे. कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन उद्यापासून लोकांमध्ये जाणार आहे" घोषणा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. कोणी काय भूमिका घेतली आहे यामध्ये न जाता आम्ही लोकांमध्येच जाऊ असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारमुक्त केल्याचा टोलाही पवारांनी पीएम मोदी यांनी लगावला.

तसेच शरद पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकप्रकारे बंड केल्याचे सूचित केले आहे. तसेच पक्षांच्या विसंगत कोणी पाऊल टाकलं असेल, तर योग्य नाही असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर थेट भाष्य केले नाही. 

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली. 
  • देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. 
  • शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते.
  • पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही
  • आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत. 
  • तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार
  • राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकीय भविष्याची काळजी
  • महाविकास आघाडी एकत्र काम करणार 
  • जे घडले त्याची चिंता नाही. 


हेही वाचा

अजित पवारांनी पद सोडल्यानंतर राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची विरोधी पक्ष नेते पदी वर्णी

संजय राऊतांचे सूचक विधान, "महाराष्ट्राला लवकरच नवा..."

पुढील बातमी
इतर बातम्या