Advertisement

अजित पवारांनी पद सोडल्यानंतर राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची विरोधी पक्ष नेते पदी वर्णी


अजित पवारांनी पद सोडल्यानंतर राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची विरोधी पक्ष नेते पदी वर्णी
SHARES

जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेते पदी वर्णी लागली आहे. शरद पवारांच्या या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली.

जयंत पाटलांनी माझी प्रतोद म्हणून निवड केली आहे. त्यामुळे मी जे व्हीप काढेन, ते त्या सगळ्यांना लागू होतील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. 

ते पुढे म्हणाले, मला कुणीही विचारलं नाही, मी माझं भाग्य समजतो की मला कुणी याबद्दल विचारलं नाही. मी मेलो, तरी शरद पवारांना सोडणार नाही.

एखाद्या मुलानं म्हाताऱ्या बापाला घराबाहेर काढावं, त्या बापाला काय वाटत असेल याची आपल्याला कल्पना आहे. तुमच्या तोंडावर दु:खाची छटाही दिसत नाही म्हणजे काय? ६ तारखेला बैठक होतीच ना? त्याच्याआधीच एवढी घाई? ६ तारखेला बैठक ठेवा असं सांगून त्यानंतर ही गोष्ट करणं, याला काय म्हणायचं? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

कित्येकांच्या बायका, मुलं, नातेवाईक फोन करत आहेत की आम्ही त्यांना समजावून सांगतो. गावात उद्रेक व्हायला लागला आहे. सगळं काही आरामात सुरू नाहीये. ज्या माणसानं एकहाती तुम्हाला मोकळं मैदान दिलं, त्याला तुम्ही शेवटी काय दिलं? तुम्हाला मंत्रीपद दिलं, तुम्ही चार आमदार तरी निवडून आणले का? त्यांनीच सगळे आमदार निवडून आणायचे, पावसात सभा घ्यायच्या आणि तुम्हाला मंत्रालयात बसायला पाठवायचं?, असे ते म्हणाले. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा