'पराभवानंतर काँग्रेससोबतच काम करीन' - उर्मिला मातोंडकर

लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना ६,८८,३९५ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरला २,३५,२०१ मतं मिळाली असून गोपाळ शेट्टी यांनी उर्मिलाचा ४,५३,१९४ मतांनी पराभव केला आहे. मात्र, गोपाळ शेट्टी यांच्या विजयानंतर उर्मिला मातोंडकरनं 'पराभवानंतर देखील काँग्रेस पक्षासोबतच काम करीनं', असं म्हटलं आहे. महायुतीच्या विजयानंतर उर्मिलानं गोपाळ शेट्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिला आहेत. 'हार-जीत' ही होतचं असते, मी राजकारणात फक्त लोकसभा निवडणुकीसाठी नव्हती आली', असंही म्हटलं आहे.

काँग्रेससोबतच काम करणार

लोकसभा निवडणुकीच्या नेस्को ग्राउंडमधील मतमोजणी केंद्रावर प्रसारमाध्यमांशी बोलताना, अभिनेत्री आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरनं जनतेच्या दिलेल्या निर्णयाचा स्वागत केलं. तसंच पराभवानंतर काँग्रेससोबतच काम करणार असल्याचंं म्हटलं आहे. 

ईव्हीएम सदोष

उर्मिलानं भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय, ईव्हीएम सदोष असल्याचं आढळून आलं असून त्याबाबत एक रिपोर्ट बनवून निवडणूक आयोगाकडं तक्रार करण्यात येणार असल्याचं उर्मिलानं म्हटलं आहे. मागाठणे येथील ईव्हीएम १७ सी मध्ये स्वाक्षरी आणि मशीन यांत विसंगती आढळून आली आहे. हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे. तशी रितसर तक्रार करण्यात आली आहे, असं ट्विट उर्मिलानं केलं.


हेही वाचा -

'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडे

मुंबईतील भेंडीबाजार परिसरात भीषण आग


पुढील बातमी
इतर बातम्या