Advertisement

मुंबईतील भेंडीबाजार परिसरात भीषण आग, २ महिलांचा मृत्यू

मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील एका घरामध्ये आग लागल्याची घटनी घडली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून ११ जण या आगीत जखमी झाले आहेत.

मुंबईतील भेंडीबाजार परिसरात भीषण आग, २ महिलांचा मृत्यू
SHARES

मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील एका घरामध्ये आग लागल्याची घटनी घडली आहे. गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली होती. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून ११ जण या आगीत जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते. दरम्यान, आगीची माहिती मिळताच आग्नीशमन दलाचे गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, काही वेळातच या आगीचा भडका वाढल्यानं अग्नीशमन दलानं रात्री ११.२३ वाजताच्या सुमारास श्रेणी-३ची आग जाहीर केली.


११ जण जखमी

या आगीमध्ये फरिदा (६०) आणि नफिसा गीतम (६०) या दोन महिलांचा मृत्यू झाला. तसंच चंद्रशेखर गुप्ता (३६) आणि पुंडलिक मांडे (२७), रमेश सरगर (३५) या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही अग्निशमन दलाचे कर्मचारी असून धुराचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणं, ताहिर नालावाला (७२), मुस्तफा सोनी (४२), फरिदा छित्तरवाला (५२), सैफुद्दीन छित्तरवाला (६२), बुहराद्दीन होतालवाला (वय २९) आणि मुस्तफा हॉटेलवाला (४६) आणि अली असगर (३२)या रहिवाशांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


अग्नीशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न

भेंडी बाजार परिसरातील डब्बू स्ट्रीटवरील बोहरी मोहल्ल्यातील पंजाबी महलच्या शेजारील घराला गुरुवारी रात्री  भीषण आग लागली. या आगीचं कारण अद्याप संजलेलं नाही. मात्र, आग्नीशमन दलाचे रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अखेर पहाटे ३ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.



हेही वाचा -

भाजपाचा नाही तर हा भारताचा विजय - नरेंद्र मोदी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा