Advertisement

भाजपाचा नाही तर हा भारताचा विजय - नरेंद्र मोदी

देशातल्या कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली. देशातील जनतेचं मी माथा झुकवून नमन करतो.

भाजपाचा नाही तर हा भारताचा विजय - नरेंद्र मोदी
SHARES

आम्हाला मिळालेला हा विजय भाजपाचा नाही, तर हा विजय भारताचा, लोकशाहीचा आणि जनतेचा विजय आहे. त्यामुळे हा विजय जनतेला समर्पित करत आहोत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. १२ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या बहुमतानंतर मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. 


जनेतेचं आभार

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सायंकाळी भाजपाच्या पक्ष मुख्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी मोदी म्हणाले की,  देशातल्या कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली. देशातील जनतेचं मी माथा झुकवून नमन करतो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झाले. मतदानाचा हा आकडा आतापर्यंतच्या लोकशाहीतील सर्वात मोठा असल्याचं म्हणत मोदी यांनी देशातील जनेतेचं आभार मानले.


लोकशाहीची ताकद

मतदानाची ही आकडेवारी ही एक ऐतिहासिक घटना आहे. ४० -४२ अंश सेल्सिअस तापमान असतानाही स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झालं. भारताच्या लोकशाहीची ही ताकद जगाने ओळखायला हवी. या लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीसाठी ज्यांनी  बलिदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबीयांसाठी माझी सहवेदना प्रकट करतो. यावेळी मोदी यांनी निवडणूक आयोगाचेही आभार मानले. निवडणूक आयोग, सुरक्षा दल आणि निवडणुकीची व्यवस्था सांभाळणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद देतो, असंही मोदी म्हणाले. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा