येत्या ७ मार्चला अयोध्येला जाणार, उद्धव ठाकरेंची घोषणा

येत्या ७ मार्च रोजी पुन्हा एकदा अयोध्येला (Ayodhya) जाऊ रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मी अयोध्येला (Ayodhya) जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार असं म्हणालो होतो. त्यानुसार येत्या ७ मार्च रोजी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिली. 

हेही वाचा-

अयोध्येला जाण्यामागे कुठलं राजकारण आहे का? असा प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, देवाचं दर्शन कुणीही घेऊ शकतं. देव दर्शनामध्ये राजकारण नको. माझ्यासोबत अनेक शिवसैनिक देखील अयोध्येत दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी अयोध्येत दर्शनासाठी यावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात सीएए (caa), एनपीआर (npr) लागू करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतोय की माझ्या राज्यातल्या कोणत्याही नागरिकाचा अधिकार मी कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही, ही माझी मुख्यमंत्री म्हणून भूमिका स्पष्ट आहे. एनपीआरसाठी ३ पक्षांसह मित्रपक्षांच्या सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. एनपीआरमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे ही समिती तपासून पाहणार आहे. 

हेही वाचा-

 

पुढील बातमी
इतर बातम्या