Advertisement

मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाच समोर नाही, तर उगाच आदळआपट कशाला? - उद्धव ठाकरे

सरकारसमोर अजून मुस्लिम आरक्षणाचा (Muslim reservation) मुद्दाच आलेला नाही. जेव्हा येईल, तेव्हा त्यावर भूमिका घेऊ, त्यामुळे उगाच त्यावर आदळआपट करण्याची गरज काय?, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधकांना विचारला.

मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाच समोर नाही, तर उगाच आदळआपट कशाला? - उद्धव ठाकरे
SHARES

सरकारसमोर अजून मुस्लिम आरक्षणाचा (Muslim reservation) मुद्दाच आलेला नाही. जेव्हा येईल, तेव्हा त्यावर भूमिका घेऊ, त्यामुळे उगाच त्यावर आदळआपट करण्याची गरज काय?, असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधकांचे कान टोचले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi government) १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मते मांडली.

हेही वाचा- कालिदास कोळंबकर नौटंकीबाज, घरांच्या मुद्द्यावरून राजू वाघमारेंची टीका

मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण (Muslim reservation) देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (ncp mla nawab malik) यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली होती. मुस्लिम आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. त्यानंतर भाजपने (bjp) महाविकास आघाडी सरकारवर कडक शब्दांत टीका केली होती. मुस्लिम आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल. यावर शिवसेनेची भूमिका काय असे प्रश्न उपस्थित केले होते. 

त्यावर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) म्हणाले, अजून सरकारसमोर मुस्लिम आरक्षणाचा प्रस्तावच आलेला नाही. त्यामुळे कुणाला आधीच आदळआपट करण्याची गरज नाही. जेव्हा असा प्रस्ताव सरकारसमोर येईल, तेव्हा निकष तपासून सर्वसहमतीने त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुद्दाच समोर नसल्याने शिवसेनेनं (shiv sena) यावर अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. जेव्हा हा मुद्दा समोर येईल, तेव्हा ही शक्ती वापरावी, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

मराठा आरक्षणावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणावर (maratha reservation) न्यायालयात सरकार ताकदीनं लढत आहे. कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- आता लाभाची पदं कशी चालतात? चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (privthiraj chavan) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणासोबत मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. परंतु भाजप-शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आल्यावर मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलं, तर मुस्लिम आरक्षणाची घोषणा गुंडाळून ठेवण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षणाच्या मागणीने डोकं वर काढलं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा