Advertisement

आता लाभाची पदं कशी चालतात? चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

सामनाच्या संपादकीयमधून सोमवारी भाजपवर निशाणा साधण्यात आल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच नाराज झाले.

आता लाभाची पदं कशी चालतात? चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
SHARES

सामनाच्या संपादकीयमधून सोमवारी भाजपवर निशाणा साधण्यात आल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच नाराज झाले. आपली नाराजी व्यक्त करताना त्यांनी रश्मी वहिनींकडून इतक्या खालच्या भाषेतील टीका अपेक्षीत नव्हती. ठाकरे कुटुंबातील एकही व्यक्त एकेकाळी पदं घेत नव्हती. पण आता एकाएकी एवढा बदल कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे कुटुंबावरही निशाणा साधला. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. याआधी उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते. रश्मी ठाकरे यांच्या नेमणुकीनंतर प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली.  

हिंदूंचा स्वाभिमान हा प्रखर राष्ट्रवादाशी जोडला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवाद कदापि मार खाणार नाही. जो राष्ट्रवाद मारण्याचा प्रयत्न करील तो हिंदूंच्याच हातून मार खाईल. कारण आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत. तसंच दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते, तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती अशी टीका सामनातून भाजपवर करण्यात आली.  

या टीकेमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच संतापले. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले रश्मी ठाकरे यांच्याकडून अशा टीकेची अपेक्षा नव्हती. आम्हालाही टीका करता येते. त्यामुळे मर्यादा कुणीही सोडू नये, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, रश्मी ठाकरे खूप कर्तृत्ववान असून मी त्यांचं कौतुक केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी रश्मी ठाकरेंनी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद स्वीकारावं असं काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी ठाकरे घराण्यात पदं घेत नाहीत असं उत्तर दिलं होतं. परंतु आता सगळीच पदं ते घेत आहेत, असा टोला देखील पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा