'राज ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच' – उर्मिला मातोंडकर

कॉग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच कौतुक केलं आहे. उर्मिला या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 'राज ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नकोय, असं कुणाला वाटल ?', असं उर्मिला यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.  

मोदी-शहा यांच्यावर टीका

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं असलं, तरी महाराष्ट्रात मोदी-शहा यांच्याविरोधात सभा घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, राज ठाकरे जाहीर सभेत मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. त्याशिवाय राज यांच्या सभांचा फायदा दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसनं मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या येथील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या गोपाळ शेट्टी यांनी गेल्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव केला होता. त्यामुळं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला भाजपच्या गोपाळ शेट्टी यांचा पराभव करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

मुंबईत पालिकेनं हटवली ९ हजारपेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग्स

मुंबईतील बोरीवली, मालाड परिसरात अवकाळी पाऊस


पुढील बातमी
इतर बातम्या