इश्यू क्या है?: शिवसेना भाजपला मत मागण्याचा अधिकारचं द्यायला नको, काय म्हणाले निरूपम? बघा व्हिडिओ

इश्यू क्या है ? च्या माध्यामातून मुंबई लाइव्हनं खुद्द उमेदवारांनाच बोलतं केलं. उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसनं संजय निरूपम यांना उमेदवारी दिली. इश्यू क्या है ? असा प्रश्न त्यांना विचारताच त्यांनी पाणी, रस्ते, गटारं, ट्रॅफिक, साफसफाई यांचा पाढाच वाचला.

मुंबई लाइव्हनं संजय निरूपम यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी प्राथमिक बाबींचीच कमतरता असल्याचं मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना भाजपवर खापर फोटलं. तसंच मुंबईकरांना मूलभूत गोष्टी देऊ शकत नाही त्यांना मत मागण्याचा अधिकारचं नसल्याचं म्हटलं.

काही दिवसांपूर्वीच संजय निरूपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर त्याची धुरा मिलिंद देवरा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. परंतु यामुळं आपण नाराज नसून लोकांनी कनेक्ट होण्याची, त्यांच्याशी संपर्क करण्याची संधी मिळत असल्याचं सांगत समाधानी असल्याचं निरूमप यांनी सांगितलं.


हेही वाचा -

इश्यू क्या है?: मुंबईत हवंय पार्टी झोन, प्रिया दत्त यांचं रोकठोक मत, बघा व्हिडिओ


पुढील बातमी
इतर बातम्या