Advertisement

इश्यू क्या है?: मुंबईत हवंय पार्टी झोन, प्रिया दत्त यांचं रोकठोक मत, बघा व्हिडिओ


SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध समस्यांबाबत 'मुंबई लाइव्ह'ने उमेदवारांना बोलतं केलं. इश्यू क्या है? असं विचारत उमेदवारांकडून या समस्यांवरील समाधान शोधण्याचा प्रयत्नही केला. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रिया दत्त यांना जेव्हा त्यांच्या मतदारसंघाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी घरे, मोकळ्या जागा, मिठी नदीसोबतच नाईट लाइफबाबतही भाष्य केलं.

मुंबई लाइव्हने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या घरांच्या मुद्द्याला सर्वात पहिल्यांदा हात घातला. त्यानंतर मिठी नदीच्या स्वच्छतेचं काम बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला.


आधी निवडणूक लढवण्यास तयार नसलेल्या प्रिया दत्त अचानक निवडणूक लढवण्यासाठी कशा तयार झाल्या? या प्रश्नावर त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी देशहितासाठी लढा दिला पाहीजे असं म्हणत मन वळवल्याचं उत्तर दिलं. नाईट लाइफच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, मलाही नाइट लाइफ इन्जाॅय करायला आवडंत. परंतु त्याचा इतरांना त्रास होऊ नये यासाठी शहरात हाॅकर्स झोनप्रमाणे पार्टी झोनही तयार व्हायला हवते, असं मत मांडलं.



हेही बघा -

इश्यू क्या है ? मुंबईत पॉवरफुल लिडर्सचीच कमतरता, काय म्हणाले देवरा? पाहा व्हिडिओ

Video: माझे व्हिडिओ मतदारांसाठी रिमाइंडर काॅल- राज ठाकरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा