इश्यू क्या है ? मुंबईत पॉवरफुल लिडर्सचीच कमतरता, काय म्हणाले देवरा? पाहा व्हिडिओ

निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच उमेदवरांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. यातच मुंबईतील उमेदवारांना गाठून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न मुंबई लाइव्हनं केला. मुंबई लाइव्हनं असाच संवाद साधला दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याशी.

  • इश्यू क्या है ? मुंबईत पॉवरफुल लिडर्सचीच कमतरता, काय म्हणाले देवरा? पाहा व्हिडिओ
SHARE

निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच उमेदवरांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. यातच मुंबईतील उमेदवारांना गाठून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न मुंबई लाइव्हनं केला. मुंबई लाइव्हनं असाच संवाद साधला दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याशी. मिलिंद देवरा यांनी बोलताना थेट मुंबईत पॉवरफुल लिडर्सचीच कमतरता असल्याचं मत व्यक्त केलं. तर दुसरीकडे आज मुंबईतल्या लोकांना आपले खासदार, आमदार माहित नाही नसल्याचंही म्हटलं.


मोठ्या उद्योजकांकडून पाठिंबा मिळाल्यानंतर मिलिंद देवरा यांचं मनोबल नक्कीच वाढलं असेल. यातच बोलताना त्यांनी थेट दोन मुद्द्यांना प्राधान्य दिलं. रोजगार आणि महिला सुरक्षेचा प्रश्न हा आपल्यासाठी प्राथमिक स्थानावर असल्याचं त्यांनी म्हटलं. बेरोजगारीसारखा मुद्दा पुढे जाऊन देशासाठी घातक ठरू शकतो, अशी भितीही देवरा यांनी बोलताना व्यक्त केली.    
हेही पाहा -

इश्यू क्या है ? महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं आवश्यक, काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर, बघा व्हिडिओ

इश्यू क्या है ? डम्पिंग ग्राऊंडमुळं रहिवासी पडताहेत आजारी, काय म्हणाले संजय दिना पाटील? बघा व्हिडिओसंबंधित विषय
ताज्या बातम्या